योग एक दर्शन

योग एक दर्शन

मानवी जीवन ज्या समष्टीमध्ये आणि सृष्टीमध्ये उभे आहे त्यांचा समग्र विचार हे भारतीय चिंतनपरंपरेचे व दर्शनांचे वैशिष्ट्य आहे. असा समग्र विचार करणारी न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, वेदांत आणि उत्तर मिमांसा ही षडदर्शने भारतीय परंपरेत आहेत, त्यातले एक दर्शन म्हणजे योग. दर्शन म्हणजे केवळ तात्विक चर्चा नव्हे तर त्याची अनुभुती.

योग म्हणजे जोडणे, किंवा खरे तर जोडलेले जाणणे. या विश्वातली प्रत्येक गोष्ट परस्परांशी जोडलेली आहे. माणसाच्या व्यक्तिमत्वात शरीर, मन, बुद्धी परस्परांशी अविच्छिन्नपने संलग्न आहे, तसेच प्रत्येक व्यक्ती सभोवतालच्या माणसांशी, निसर्गाशी जोडलेला आहे. 
अर्नेस्ट हेमिंग्वे त्याच्या For whom the bell tolls कादंबरीत John Donne चे No man is an island entire in itself. Each is a piece of the continent. Each man’s death diminishes me, for I am involved in mankaind. Therefore send not to know, for whom the bell tolls, it tolls for thee.” हे उद्धरण देतो त्यापमाणे किंवा Quantum physics मधील unified field theory नुसार हेच आधुनिक विज्ञानही सांगते.
या जोडण्याच्या प्रक्रियेत जेंव्हा विसंवाद, असंतुलन, संघर्ष असतो तेंव्हा दु:ख, व्याधी, विकार निर्माण होतात व जेंव्हा सुसंवाद, संतुलन, संयोजन असते तेंव्हा सुख, आनंद, पूर्णत्व प्रगट होते, या दिशेने वाटचाल करण्यासाठी सहाय्य करणारे, दिशा दाखवणारे शास्त्र म्हणजे योग आहे.

 

Vote: 
No votes yet
Language: